आपल्या खांद्याचा सांधा बॉल आणि सॉकेट जॉईंट प्रकारातील सांधा आहे. खांद्याचा प्रत्येक आजार हा फ्रोझन शोल्डर आहे असा मोठा गैरसमज समाजामध्ये आहे. पण , खांद्याशी निगडीत अनेक आजार आहेत जसे की,
१) खांद्यातील स्नायू फाटणे.
२) खांद्याची झीज होणे .
३) स्नायूंमध्ये कॅल्शियम जमा होणे .
४) खांद्याचे हाड वाढणे .
लक्षणे व कारणे – खांद्याला हिसका बसणे किंवा मार लागणे यामुळे खांद्याला इजा होऊन फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण पाचपट जास्त आहे . साधारणतः ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे .
स्त्रियांना हात मागे घेऊन केस विंचरणे, वेणी घालणे तर पुरुषांना पॅन्टच्या मागील खिशातून पाकीट काढणे यांसारख्या क्रिया करताना वेदना होतात. रात्री झोपताना या वेदना जास्त वाढतात . (Night pains)
फ्रोझन शोल्डर चे तीन टप्पे आहेत –
1) या टप्प्यात खांद्यामध्ये वेदना होतात.(Pain)
2) खांदा जखडला जाऊन त्याच्या हालचालींवर मर्यादा येतात (Stiffness).
3) जखडणे कमी होऊन खांद्याच्या हालचाली वाढतात (Thawing).
आता यावरील उपचारासंबंधी थोडे जाणून घेऊ.
पहिल्या टप्प्यात औषधे व फिजोथेरपी च्या मार्गदर्शनाखाली दोन ते तीन महिने व्यायाम करावे लागतात. ९०% रुग्ण या उपचारांनी बरे होतात .
जे रुग्ण या उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, त्यांना Hydrodialation ही पद्धत वापरली जाते.
Hydrodialation ही Day care procedure असून, यामध्ये योग्य भुलेखाली खांद्यामध्ये injection दिले जाते. पहिल्या आठवड्यातच हालचालींमध्ये ४० % फरक पडतो. तर एक महिन्यामध्ये रुग्णाला ८० % हालचाली करता येतात. रात्री होणाऱ्या वेदनादेखील ९०-१००% पर्यंत कमी होतात .
२ % रुग्ण जे वरील दोन्ही उपचारांनी बरे होत नाहीत, त्यांच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. (Arthroscopic surgery). या शस्त्रक्रियेमध्ये खांद्याजवळ ८-१० mm चे २ किंवा ३ छेद घेतले जातात.
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये एक दिवस ऍडमिट रहावे लागते, तसेच वेदनादेखील कमी असल्यामुळे खांद्याचे व्यायाम लगेचच चालू करता येतात .
म्हणूनच फ्रोझन शोल्डर विषयी असलेले गैरसमज बाजूला ठेवून, लवकर निदान व योग्य उपचार घेतल्यास खांदा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि रुग्णाला पूर्ववत आयुष्य जगता येते.
डॉ. अभय कुलकर्णी
MS (Ortho) MRCS (Edinburgh) UK
Specialist Shoulder Surgeon,
ब्रह्मचैतन्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चिंचवड.
संपर्क.8149400021