मी सौ.मिनाक्षी शहाजी तळेकर राहणार पिंपरीगाव मला गेली एक ते दीड वर्षापासून उजव्या हाताच्या खांद्याचा फार त्रास होत होता. यावर सर्व प्रकारचे इलाज करून पाहिले परंतु कोणत्याही औषध उपचाराचा काहीच फरक पडत नव्हता. माझी खांदेदुखी इतकी असंवेदनीय होती की, मला त्याचा फार त्रास होवू लागला होता. त्यामुळे माझे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नव्हते तसेच कोणतेही काम करण्यात रस नव्हता. माझ्या उजव्या हाताची इतकी ताकत कमी झाली होती की मला साधा त्या हाताने भरलेला पाण्याचा ग्लास उतलणे देखील सहन होत नव्हते.
एकेदिवशी मी ड़ॉ.अभय कुलकर्णी सर यांना भेटले त्यांनी माझ्या हाताची पुर्ण पाहणी केली. त्यांना मी माझ्या पुर्ण वेदना सांगितल्या त्यावेळी माझ्या हाताची पुर्णपणे हालचाल (वर-खाली) देखील होत नव्हता. तसेच वेदना देखील असह्य होत होत्या. त्यांनी सर्व प्रथम माझ्या वेदनेची संपुर्ण स्थिती लक्षात घेतली व माझ्या हातावर ट्रीटमेंट करण्यास सुरवात केली. त्यांनी माझ्या हाताचा MRI करण्यास सांगितले व त्या नुसार ट्रीटमेंट करण्यास सुरवात केली. त्यांनी माझ्या उजव्या हाताच्या खांद्याला इंजेक्शन दिले. आणि थोड्याच दिवसांत माझ्या हाताची पुर्ण पुणे हालचाल होण्यास सुरवात झाली आणि वेदना देखील 90% कमी झाल्या. मी माझे काम आता पहिल्या सारखे करू लागले.
मी डॉ.अभय कुलकर्णी सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या उजव्या हाताच्या खांद्याच्या वेदनेपासून मुक्तता केली. पुन्हा एकदा मनापासू आभार.