हे माझे पुष्कळ दिवसानंतर आलेले लेखीपत्र पाहून आश्चर्य वाटेल पण मध्यंतरी काही वेळ आॅपरेशन नंतर लवकर व्यवस्थीत होण्याच्या निर्धाराने व निग्रहाने प्रयत्न केल्यानंतर समाधान वाटल्यावर आपणांस हे सर्व लिहून पाठविण्यास विलंब झाला.
खूप अगोदर पासून मला आपणांस आपण दिलेल्या उपचारांबद्दल व सहयोगाबद्दल कळवायचे होते. ज्या दिवशी माझ्या पायाचा अपघात झाला व फ्रैक्चर अस्ण्याचे स्पष्ट झाले तेव्हा मी हतबल व मनाने दुर्बल झालो होतो. पुढील योग्य उपचारासाठी डाॅ निखिलने आपले नाव सुचविले. माझी कन्या चित्रा व प्रज्ञा यांनी मला आॅपरेशन साठी दाखल केले. संध्याकाळी आपण येईपर्यंत हताश मनाने बेडवर पडून होतो.
संध्याकाळी आपण आलात. झालेल्या घटणेबद्दल मला अगदी आपले पणाने विचारपूस केली व सुधारणा होण्या बद्दल धीर दिला. आपली ती पद्धत व समोर असलेले व्यक्तिगमत्व पाहून मी इतका प्रभावित झालो कि मी काही वेळ माझे दुःख व मनाचे दुर्बल्य पार विसरून गेलो. माझ्या मनात नवीन चैतन्य व निग्रह निर्माण झालं. माझ्या अंतर्मनाने ग्वाही दिली की माझे आपणाकडून आॅपरेशन झाल्यानंतर पूर्णपणे बरा होइल व दोन्ही पायावर व्यवस्थीत चालू लागेल. दवाखान्यात दाखल केल्यानंतर तेथील सर्व परिचारिकांनी केलेल्या शुश्रशेने व आपल्या सर्व डाॅक्टर मित्रांच्या सहयोगाने आज मी पूर्णपणे बरा झालो आहे. कोणत्याही आधार न घेता मी दोन्ही पायावर चालू शकतो, जीन्यावर सुध्दा सहज चढउतार करू शकतो व व्यवहार करण्यात स्वावलंबी झालो आहे.
आपण केलेल्या उपचारानंतर व आपला मिळालेल्या सहवासानंतर माझ्या जुन्या स्वभावात असलेल्या स्वाभिमानाला नवीन उम्मेद, उत्साह व चैतन्य मिळाले. तुम्ही डाॅक्टर म्हणून केलेल्या उपचारानंतर मला लहानपणी त्यावेळेच्या माझ्या डाॅक्टर वडीलांच्या स्मृती जागृत झाल्या.
विशेष म्हणजे आपण केलेल्या कौशल्यपूर्ण आॅपरेशन नंतर मला तब्येतीबद्दल किंवा आॅपरेशन बद्दल तक्रार करण्यास कोणतीही संधी दिली नाही, याबद्दल आपले जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
मी माझ्या मय:स्फुर्ति देवतांना स्मरून त्या अगाध शक्तीजवळ येवढीच विनंती करतो की यापुढे तुम्हाला तुमच्या या कामात वारंवार प्रगती होत जावो. पुढील सर्व आयुष्य सुखाचे समृध्दीचे जाओ.
तुम्ही करत असलेल्या या व्यवसायात मला आलेल्या अनुभवावरून खात्री आहे की तुम्ही लवकरच मोठ्या नावलौकिकास याल व या व्यवसायातील यशोमंदिराचे उच्च शिखर गाठाल.
प्रामाणिकपणे करत असलेल्या या तुमच्या व्यवसायाूद्दल व पेशंटमधे निर्माण करत असलेल्या चैतन्यपूर्ण वातावरणाबद्दल त्रिवार वंदन.