Anuradha Joshi

Shoulder Arthroscopy – Rotator Cuff Repair Surgery

मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये माझे (रोटेटरकफ़) खांद्याचे ओपेशन झाले . त्यापूर्वी कितीतरी दिवस मला उजव्या हातानी काही करता येत नव्हतं .सतत दुखायचा… स्टिफ झाला होता …बरेच उपचार करून पाहिले पण उपयोग झाला नाही … शेवटचा उपाय म्हणून डेक्कन सह्याद्रीला शोल्डरचे तज्ञ डॉ.अभय कुलकर्णी याना दाखवले .ओपेशन करणं कसे अनिवार्य आणि फायदेशीर आहे हे त्यांनी समजावून सांगितले. आपला उजवा हात सतत काम करत असतो त्यामुळे खांद्याच्या फाटलेल्या मसल्स आणखी डॅमेज होतील आणि बरेच मोठे ऑपरेशन करावं लागेल (जर ऑपरेशन लांबवल तर ) साध्य परिस्तितीत लगेच केलं तर दुर्बिणीने ,खांद्याला फक्त चार भोक पाडून ते ओपेशन करणे शक्य आहे .मी ओपेशन ला तयार झाले .ते यशस्वी झालं आणि आज माझा उजवा हात पूर्ववत झालेला आहे.
फक्त दोन दिवस हॉस्पिटल मध्ये राहावं लागलं .नंतर चा दिड महिना हाताची खूप काळजी घावी लागते… .नंतर हळूहळू सोपे व्यायाम… मग फिजिओथेरपि ….साधारण ३ महिने …आणि आपला हात पूर्ववत .यात ओपेशन इतकेच महत्व फिजोथेरपीत आहे .ओपेशन उत्तम होऊनही केवळ फिजोथेरपीचा आळस केल्यामुळे किंवा दुखत दुखत म्हणून कौतुक करत बसल्यामुळे बऱ्याच पेशंटची तक्रार असते .आमचं ओपेशन अयशस्वी झालं …ठपका अर्थात डॉक्टरांवर ठेवला जातो. हे सर्व खरं तर आपल्याच हातात असते .
आता मी माझ्या उजव्या हातानी, लेखन, पेन्टिंग, वजन उचलणे ,स्वयंपाकघरातील सगळी काम अगदी सहज करतेय. त्याच श्रेय डॉ. अभय कुलकर्णी यांना आहे.त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि या प्रकार च्या ऑपरेशनची उपयुक्तता आणि आवश्यकता या दोन्ही गोष्टी अश्याप्रकारच्या धुखण्याने ग्रस्त असलेल्या पेशंटना कळाव्यात म्हणून मी हे मनोगत लिहिलं आहे. हुषार अनुभवी ,तज्ञ आणि पेशेंटकडे आस्थेने बगणारे डॉक्टर मिळाले की आर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा ..
तेव्हा हाताच्या सततच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेदनामुक्त होणं केव्हाही चांगलं. माझं वय आज ७३ वर्षाचं आहे. उतार वयात निरामय , स्वावलंबी आयुष्य फार महत्वाचं असत. कवी मंगेश पाडगावकरांच्या म्हणण्याप्रमाणे " कस जगायचं ते आपणच ठरवायच असत
“कण्हत कण्हत की गाणी म्हणत …….”