Parag Joshi

Total Hip Replacement

श्री स्वामी समर्थ.नमस्कार मी पराग रामचंद्र जोशी. राहणार पुणे, तालुका हवेली. मी नुकतेच म्हणजे जुलै 2020 मध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट चे ऑपरेशन डॉक्टर अभय कुलकर्णी सर यांचे कडून करून घेतले.माझ्या उजव्या पायाचा खुब्याचा सांधा आणि पूर्ण गोल् हाड झिजल्या मुळे मी नीट उभा राहू शकत नव्हतो की नीट चालु ही शकत नव्हतो. वेदना आणि ठणका सहन करण्यापलीकडे गेला होता. तीन वर्षापर्यंत अनेक औषधे आणि अनेक उपचार केले पण यश आले नाही. मग मात्र मी अभय सरांना सह्याद्री हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटलो. तेव्हा त्यांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मी त्यांना मला ऑपरेशनची भीती वाटते असे सांगितले. परंतु त्यांनी मला या सर्जरी चे फायदे आणि जीवनात होणारा सकारात्मक बदल कसा होतो हे पटवून दिले, आणि खरोखरच ऑपरेशन नंतर माझे जीवन पुन्हा पहिल्यासारखे झाले.

आज अभय सरांमुळेच मी पुन्हा माझ्या पायावर उभा राहू शकलो आणि तेही भक्कम पणे.

तसेच मी माझ्या सर्व रोजच्या व्यवहारातील सर्व कार्यक्रम सहजपणे करू शकतो. अनेक प्रकारचे व्यायाम ओपन जिम ची साधने, सायकल दुचाकी तसेच चारचाकी छानपणे वापरू शकतो. यासाठी सर्वार्थाने मी डॉक्टरांना आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो.